मराठी संस्कृती समृध्द करणारे विविध सणवार, मराठमोळे दाग-दागिने, लग्नाचे विधी, रांगोळया केव्हां व कशा काढायच्या, सणावारांशी संलग्न अशा खास मराठी पाककृती, व्रत-वैकल्ये, परवचा व विविध स्तोत्रे इत्यादींसारख्या संस्कृतीशी निगडीत विषयांना वाहिलेले हे 'संस्कृती' दालन.
मराठी सणवार
दैनंदिन आयुष्य जगताना आपण कंटाळून जात असतो. काहीतरी नवीन घडण्याची वाट पहात असतो. माणसाच्या या सतत नाविन्याच्या आणि बदलाच्या ओढीने तो समारंभासाठी निमित्ते शोधत गेला. भारतातील तेहतीस कोटी देव, त्यांच्याशी निगडीत असलेल्या पौराणिक कथा, निसर्गात सतत घडणारे बदल, ऋतुमान या सर्वांशी सांगड घालून विविध सणवार यांची निर्मिती झाली. त्याच्याशी निगडीत असे खाद्यपदार्थ, पूजा, आराध्य दैवत वगैरे प्रथा सुरू झाल्या. आपण या प्रथा जरी वर्षानुवर्षे पाळत असलो तरी त्यांविषयीची पारंपारिक माहिती सर्वांना असतेच असे नाही. ही माहिती अत्यंत रंजक आहे. ती आपल्याला या विभागात पहायला मिळेल.विविध सणवारांची माहिती
No comments:
Post a Comment