" एकता " त्रैमासिक : गेली ३३ वर्षें भारताबाहेर जपलेला मायमराठीचा दीपस्तंभ
" एकता " त्रैमासिक : गेली ३३ वर्षें भारताबाहेर जपलेला मायमराठीचा दीपस्तंभ
एकता हे
त्रैमासिक म्हणजे अखिल मराठी भाषकांसाठी गेली ३३वर्षें कॅनडामधील टोरांटो
येथून मायमराठीच्या अतूट धाग्याने गुंफलेली एक कलाकृती. टोरांटो, कॅनडा
येथील अशोक पांगारकर, प्रकाश अडावदकर, डॉ. जोशी (पिट्स्बर्ग, अमेरिका) आणि
काही ध्येयवेड्या मराठीप्रेमी मंडळींनी विना नफा तत्त्वावर १९७९ साली ’
एकता ’ ह्या त्रैमासिकाचा श्रीगणेशा केला. आपापले व्यवसाय आणि व्यस्त
वेळापत्रक सांभाळून सेवाभावनेने ह्या लष्करच्या भाकर्या भाजतांना भाकरीची
चव टिकवणे सोपे नाही. ह्या त्रैमासिकातील दर्जेदार मजकूर, संपादन, छपाई आणि
वितरणामधे कित्येक स्वयंसेवक, लेखक, वर्गणीदार वाचक आणि काही प्रमाणात
आर्थिक पाठिंबा देणारे व्यावसायिक जाहिरातदार असे अनेक मराठी भाषक गेली ३३
वषें एकत्वाचे सूत्र जपत आहेत. ’ एकता ’ च्या आतापर्यंतच्या तीन दशकोत्तर
यशस्वी वाटचालीमागे अनेकांचे परिश्रम आहेत. ह्या प्रदीर्घ कालावधीत ज्या
काही व्यक्तींच्या/कुटुंबीयांच्या पावलांचा खोल ठसा उमटलेला आहे. त्यातले
एक ठळक नांव आहे - टोरांटोवासी विनायक गोखले आणि प्रतिभा गोखले.
No comments:
Post a Comment