मराठीतील 'ई-बुक' बनताहेत कोकणातील खेड्यात
जगाच्या पाठीवर कोणत्याही भागामध्ये आता मराठी पुस्तक वाचणे शक्य झाले आहे ते ' ई-बुक '
मुळे. कम्पुटर आणि इंटरनेटमुळे जगभर पोहोचलेले हे साहित्य सध्या तयार होते
आहे ते रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा या छोट्याशा गावांमध्ये. विश्वास
बसला नाही तरीही ही वस्तुस्थिती आहे. ' बुकगंगा डॉट कॉम ' या कंपनीने हे शक्य करून दाखविले आहे.
' बुकगंगा ' चे संस्थापक मंदार जोगळेकर हे मराठी ' ई-बुक '
मध्ये आघाडीचे नाव आहे. ते मूळचे साखरपा या गावचे. आपल्या गावातील
मुलांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे या ध्यासामधून त्यांनी
हा उपक्रम राबविला आहे. गेले सहा महिने तो यशस्वीपणे सुरू असल्याचे त्यांनी
सांगितले. आपल्या कंपनीच्या माध्यमातून ' कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ' चा (सीएसआर) उपक्रम म्हणून हा प्रकल्प राबवत असल्याचे त्यांनी ' मटा ' ला सांगितले.
अमेरिकेमध्ये प्रत्येक छोट्या गावांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून रोजगार
निर्मिती करण्यात येते. साहजिकच रोजगारासाठी शहराची वाट धरणाऱ्यांची
संख्या तेथे खूप कमी आहे. हाच प्रयोग भारतामध्ये करणे शक्य आहे हेच
जोगळेकरांनी सिद्ध करून दाखविले आहे.
साखरपा
हे गाव रत्नागिरी या जिल्हाच्या ठिकाणापासून जवळ आहे. या गावातील कॉमर्स
आणि आर्ट्स शाखेतील ग्रॅज्युएट झालेल्या वीस मुला-मुलींना प्रशिक्षण देऊन
या उपक्रमामध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे. तेथील अपुरा वीजपुरवठा
लक्षात घेऊन बॅटरी बॅकअप आणि जनरेटरची सोय करण्यात आली आहे. ही मुले हे
सगळे काम अतिशय कौशल्याने पार पाडत असून , त्यांना
गरजेप्रमाणे प्रशिक्षण देण्यासाठी पुण्यातील तज्ज्ञांना बोलविण्यात येते.
या कामासाठी लागणारी सर्व कौशल्ये या मुलांनी आत्मसात केली असून , एखाद्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या दर्जाचे काम ती आता करतात.
' गावातच राहून ,
प्रसंगी शेतीचे काम करूनही हे काम करता येत असल्याने रोजगाराचे एक नवीन
साधन त्यांना मिळाले आहे. त्याचबरोबर आपल्या गावासाठी काही तरी केल्याचे
समाधान मिळते आहे ,' असे जोगळेकर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment