Tuesday, 25 November 2014

श्री महाराष्ट्र पंचायत ( कराची-पाकिस्तान )

श्री महाराष्ट्र पंचायत ( कराची-पाकिस्तान )




 श्री महाराष्ट्र पंचायत ( कराची-पाकिस्तान )



अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या …….
 /shrimaharashtrapunchayat
/marimatamandirratantalao



 

उत्सुकता पाकिस्तानात : मराठी साहित्य संमेलनाची

उत्सुकता पाकिस्तानात : मराठी साहित्य संमेलनाची


मराठी साम्राज्याचा झेंडा अटकेपार पोहोचला होता. आता त्याच अटकेजवळ घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाविषयीची सीमेपार पाकिस्तानात उत्सुकता निर्माण झाली असून, पाकिस्तानातील कराची येथून काही मराठी माणसे साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

एके काळी कराची हा मुंबई प्रांताचाच भाग होता. त्यामुळे नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने अनेक मराठी कुटुंबे कराचीमध्ये वास्तव्याला होती. फाळणी झाल्यानंतरही काही लोकांनी पाकिस्तानातच राहणे पसंत केले. आताही कराची शहरात हजारच्या आसपास मराठी कुटुंबे राहतात. हे सर्व मराठी लोक 'महाराष्ट्र पंचायत' या संस्थेशी जोडलेले आहेत. या संस्थेने कराचीमध्ये मराठी भाषेचे पुनरुज्जीवन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच घुमान येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्यासाठी या संस्थेने तयारी दर्शवली आहे. त्यासाठी त्यांनी संमेलनाचे आयोजक भारत देसडला आणि संजय नहार यांच्याशीही संपर्क साधला आहे.

  'पाकिस्तानात बरीच मराठी कुटुंबे आजही वास्तव्य करतात. त्यांची आडनावे जाधव, जगताप अशीच आहेत. आपल्याप्रमाणेच सर्व सण, परंपरा त्यांनी टिकवून ठेवल्या आहेत. त्यांना मराठी भाषेचा काही प्रमाणात विसर पडला आहे. मात्र, ती त्यांना पुनरुज्जीवित करायची आहे. त्यासाठी त्यांनी धडपड सुरू केली आहे. महाराष्ट्र पंचायत या संस्थेने आमच्याशी संपर्क साधून संमेलनाला येण्याबाबत उत्सुकता दाखवली आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे घुमानचे संमेलन ऐतिहासिक ठरेल,' असे त्यांनी सांगितले.

Tuesday, 18 November 2014

जपानमधील मराठी मंडळ




तोक्यो मराठी मंडळ ही मराठी भाषा, संस्कृती व रितीरिवाजात रुचि असलेल्या लोकांची अनौपचारिक संस्था आहे. हे मंडळ संस्कृतीक कार्यक्रम, सण, सहली या सारख्या माध्यमातून लोकांना एकत्र आणून परदेशातही आपले मराठीपण टिकवून ठेवण्यात प्रयत्नशील आहे.
 
सतत बदलत रहाणे हे वर्ल्ड वाईड वेब चे वैशिष्ट्यच आहे. नाविन्याची आवड असणाऱ्या वाचकांसाठी वेब साईटही अधुन मधुन आपले रंग रूप बदलत असतात. डॉ. बापटांनी चालू केलेली तोक्यो मराठी मंडळाची साइट सुध्दा त्याला अपवाद नाही. ही साईट तयार करण्यात, त्यातील मचकूर सुंदर रंगात आणि ढंगात सादर करण्यात अनेक जणांनी आपापल्या परीने योगदान दिलेले आहे.
 
  लोकांचे योगदान
- १९९९ सालच्या संक्रांती पासून २००१ सालच्या डिसेंबर पर्यंत डॉ. बापटांनी या साईटचे काम पाहिले. या काळात अनेक जणांनी त्यांना मदत केली.
- अश्विनी व मंगेश गोखले (संक्रांत १९९९ ते गणेशोत्सव १९९९, तसेच यांनी सणवरांची पाने तयार केली)
- हिमानी कुलकर्णी (संक्रांत १९९९ ते साकुरा बाजार २०००)
- प्रिती गांधी (मे २००० ते ऑक्टोबर २०००)
- सुनिती पारसनिस (जुलै २००० ते डिसेंबर २००२)
- २००२ सालच्या जानेवरी महिन्यापासून मंडळाचे काम नवीन कार्यकारिणी मंडळाकडे सुपूर्त करण्यात आले.
- सुनिती पारसनिस (जानेवारी २००२ ते सप्टेंबर २००३)
- अमित चितळे (सप्टेंबर २००३ ते मार्च २००५)
- मालविका वैद्य (जानेवरी २००१ ते डिसेंबर २००९)
- २०१० जानेवारी पासून साईटचे काम निरंजन गाडगीळ पहात आहेत. ऑनलाईन नोंदणीच्या कामामध्ये राहुल कुलकर्णी व उमेश देशमुख यांनी मदत केली आहे.

संकेतस्थळ -: http://tokyomarathimandal.com/

Monday, 17 November 2014

मराठीतील 'ई-बुक' बनताहेत कोकणातील खेड्यात


मराठीतील 'ई-बुक' बनताहेत कोकणातील खेड्यात 

 जगाच्या पाठीवर कोणत्याही भागामध्ये आता मराठी पुस्तक वाचणे शक्य झाले आहे ते ' ई-बुक ' मुळे. कम्पुटर आणि इंटरनेटमुळे जगभर पोहोचलेले हे साहित्य सध्या तयार होते आहे ते रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा या छोट्याशा गावांमध्ये. विश्वास बसला नाही तरीही ही वस्तुस्थिती आहे. ' बुकगंगा डॉट कॉम ' या कंपनीने हे शक्य करून दाखविले आहे.
' बुकगंगा ' चे संस्थापक मंदार जोगळेकर हे मराठी ' ई-बुक ' मध्ये आघाडीचे नाव आहे. ते मूळचे साखरपा या गावचे. आपल्या गावातील मुलांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे या ध्यासामधून त्यांनी हा उपक्रम राबविला आहे. गेले सहा महिने तो यशस्वीपणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या कंपनीच्या माध्यमातून ' कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ' चा (सीएसआर) उपक्रम म्हणून हा प्रकल्प राबवत असल्याचे त्यांनी ' मटा ' ला सांगितले.

अमेरिकेमध्ये प्रत्येक छोट्या गावांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून रोजगार निर्मिती करण्यात येते. साहजिकच रोजगारासाठी शहराची वाट धरणाऱ्यांची संख्या तेथे खूप कमी आहे. हाच प्रयोग भारतामध्ये करणे शक्य आहे हेच जोगळेकरांनी सिद्ध करून दाखविले आहे.
साखरपा हे गाव रत्नागिरी या जिल्हाच्या ठिकाणापासून जवळ आहे. या गावातील कॉमर्स आणि आर्ट्‍स शाखेतील ग्रॅज्युएट झालेल्या वीस मुला-मुलींना प्रशिक्षण देऊन या उपक्रमामध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे. तेथील अपुरा वीजपुरवठा लक्षात घेऊन बॅटरी बॅकअप आणि जनरेटरची सोय करण्यात आली आहे. ही मुले हे सगळे काम अतिशय कौशल्याने पार पाडत असून , त्यांना गरजेप्रमाणे प्रशिक्षण देण्यासाठी पुण्यातील तज्ज्ञांना बोलविण्यात येते. या कामासाठी लागणारी सर्व कौशल्ये या मुलांनी आत्मसात केली असून , एखाद्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या दर्जाचे काम ती आता करतात.
' गावातच राहून , प्रसंगी शेतीचे काम करूनही हे काम करता येत असल्याने रोजगाराचे एक नवीन साधन त्यांना मिळाले आहे. त्याचबरोबर आपल्या गावासाठी काही तरी केल्याचे समाधान मिळते आहे ,' असे जोगळेकर यांनी सांगितले.

अमेरिकेतील मराठी शाळेच्या शाखा

अमेरिकेतील मराठी शाळेच्या शाखा

मराठी शाळेच्या सध्या खालील प्रमाणे शाखा आहेत:

मेरीलँड:
१. पोटोमॅक - दीप्ति पंडीत - मराठी शाळा संचालिका शिक्षिका.
२. गेथर्स्बर्ग - नीलम वैद्य - शिक्षिका.

व्हर्जिनिया:
३. स्टर्लिंग - श्रुती पांडे - शिक्षिका.
४. स्टर्लिंग - प्राजक्ता सप्रे - शिक्षिका.
५. शबर्न - स्वाती कुलकर्णी - शिक्षिका.
६. शबर्न - सोनल वाटवे - शिक्षिका.
७. रेस्टन - नेहा बेंद्रे - शिक्षिका.

Saturday, 15 November 2014

अमेरिकेतल्या मराठी शाळा (पैलतीर)

अमेरिकेतल्या मराठी शाळा (पैलतीर)

अमेरिकेतल्या मराठी शाळा (पैलतीर)
- वैभव पुराणिक, लॉस एंजलिस
शुक्रवार, 24 ऑक्टोबर 2014 - 02:45 AM IST
अमेरिकेत सप्टेंबरमध्ये सर्वसाधारणत: शाळांची सत्रे सुरु होतात. सप्टेंबरमध्ये उन्हाळा संपून फॉल किंवा पानगळीचा मोसम सुरु होतो. सप्टेंबरमध्ये इतर शाळांबरोबर इथे मराठी शाळांचीही सत्रे सुरु होतात. बृहन्महाराष्ट्र मंडळाने मराठी पुढच्या पिढीपर्यंत पोचावी या हेतूने सुरु केलेल्या या रोपाचा आता वटवृक्ष झाला आहे. 
पालक मराठी असले आणि ते घरात मराठी बोलत असले तर येथील बहुतेक मुलांना मराठी समजतं. पण ही मुलं शाळेत जायला लागल्यावर मात्र मराठी बोलणं जवळजवळ सोडून देतात. मग घरोघरी आई वडील मराठीत प्रश्न विचारत आहेत आणि मुले इंग्रजीत उत्तर देत आहेत असे दृष्य दिसतं. मग मराठी वाचायचे तर दूरच राहो. त्यामुळे ज्या मराठी भाषेने आपलं पालन-पोषण केलं, ती भाषा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचत नाही, हे येथील मराठी लोकांच्या लक्षात आलं. त्या दृष्टीने पावले उचलावीत म्हणून उत्तर अमेरिकेच्या अनेक शहरात-विशेषत: मोठ्या शहरात एकत्र जमून आपल्या मुलांना मराठी शिकवायचे प्रयत्न सुरु झाले. कॅनडाच्या टोरांटोमध्ये अशीच एक मराठी शाळा 1976 मध्ये शरद कावळे यांच्या पुढाकाराने सुरु झाली. ही शाळा आजतागायत चालू आहे. अमेरिकेच्याही काही शहरांत अशा शाळा सुरु झाल्या; पण त्या फार काळ टिकल्या नाहीत. घरगुती स्वरुपात अधून-मधून शाळा सुरु होत होत्या व बंदही पडत होत्या. पण वेगवेगळ्या शहरात सुरु असलेल्या या प्रयत्नांत ताळमेळ नव्हता. प्रत्येक जण आपापल्या कुवतीप्रमाणे मराठीचं शिकवायचा प्रयत्न करत होता. 2007 च्या आसपास बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या हे लक्षात आले. त्यांनी या सर्व शाळांना एका धाग्याने बांधायचं ठरवलं. त्यांनी नेमलेल्या समितीवरील सुनंदा टुमणे आणि विजया बापट यांनी मेहनत करून या शाळांसाठी उत्तर अमेरिकन संदर्भ असलेला अभ्यासक्रम बनवला. आपण बनवलेल्या या अभ्यासक्रमाला भारतातील एखाद्या विद्यापीठाची अथवा शिक्षणसंस्थेची मान्यता मिळावी, या हेतूने हा अभ्यासक्रम भारतातील अनेक शिक्षणसंस्थांना दाखवण्यात आला. 
2009-10 च्या दरम्यान टोरांटोच्या लीना देवधरे यांना भारती विद्यापीठाची मान्यता मिळवण्यात यश आले. अशा प्रकारे आज सुरु असलेल्या मराठी शाळांचा जन्म झाला. त्यानंतर निवडून आलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळांच्या प्रत्येक समित्यांनी शाळा प्रकल्पाचा पाठपुरावा केला आहे. या संदर्भात बोलताना शाळा प्रकल्पाचे बृहन्महाराष्ट्र मंडळासाठी असलेले महत्त्व मंडळाचे अध्यक्ष सुनील सूर्यवंशी यांनी मला सांगितले. "भाषेकरवी एक प्रकारे मराठी संस्कृतीशी आपल्या पुढच्या पिढीची नाळ बांधली जात आहे. ही मुले जेव्हा मोठी होतील तेव्हा महाराष्ट्र मंडळात आपण मराठी कलांबरोबर एक चांगली भाषाही शिकलो, हे त्यांच्या लक्षात राहील. त्यामुळेच बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे,‘‘ असे ते म्हणाले. 
कशी आहे ही शाळा?
ही शाळा म्हणजे इतर शाळांप्रमाणे पूर्णवेळ शाळा नाही. शनिवरी किंवा रविवारी याचे वर्ग भरतात. वर्गाचा सर्वसाधारण कालावधी सर्वसाधारणत: आठवड्याला दीड ते अडीच तास एवढाच असतो. बृहन्महाराष्ट्र मंडळाचा हा उपक्रम स्थानिक मराठी लोकांपर्यंत पोचवण्याचे काम उत्तर अमेरिकाभर पसरलेली महाराष्ट्र मंडळे करतात. महाराष्ट्र मंडळे ही शाळा चालवतात. या शाळेतील शिक्षक व इतर स्वयंसेवक, कुठलाही मोबदला न घेता, फक्त आपल्या पुढील पिढीपर्यंत मराठी पोचावी याच एका उद्देशाने काम करतात. यातील अभ्यासक्रम हा खास अमेरिकन मुलांना लक्षात ठेवून बनवलेला आहे. अमेरिकन मुलांना भारतातली पुस्तके व संदर्भ समजत नाहीत. उदाहरणार्थ, भारतातील लहान मुलांना पोपट हिरवा असतो, हे आपण शाळेत शिकवतो. पण अमेरिकेत तशा प्रकारचे हिरवे पोपट नसतात. त्यामुळे इथल्या मुलांना हिरव्या रंगासाठी दुसरे उदाहरण द्यावे लागते. इथला ‘न‘ हा नळातला नसून नायगाराचा आहे! बघा, बघा नायगारा धबधबा, ऋतू - हिवाळा, बर्फ पडतो, हिमबुवा, सडोनाचा सूर्योदय अशा धड्यांवरून हा अभ्यासक्रम उत्तर अमेरिकेतील मुलांसाठी खास तयार केलेला आहे, हे आपल्या लक्षात येईल. 
या अभ्यासक्रमाचे पहिली ते पाचवी असे पाच स्तर तयार करण्यात आले आहेत. पहिलीमध्ये ‘आपण स्वत: कोण आहोत‘पासून पाचवीमध्ये प्रदूषण, कचरा निवारण, नैसर्गिक संकटे, सुरक्षा नियम अशा जागतिक महत्त्वाच्या समस्यांविषयी मराठीतून शिकवले जाते. तसेच, या अभ्यासक्रमात अक्षर ओळख, जोडाक्षरे, व्याकरण ओळख व सराव, कविता, प्रार्थना, पत्रलेखन, वृत्तपत्र बातमी इत्यादी गोष्टीही विद्यार्थ्यांना शिकवल्या जातात. या अभ्यासक्रमाला पुण्याच्या भारती विद्यापीठाने मान्यता दिली आहे. भारती विद्यापीठातर्फे आता या शाळेत दरवर्षी परीक्षा घेतल्या जातात. परीक्षांना बसणे बंधनकारक नसतं; पण परीक्षांना बसून उत्तीर्ण झाल्यास भारती विद्यापीठातर्फे प्रमाणपत्र मिळते. परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीनुसार शाळेतील शिक्षक त्यांना कुठल्या स्तरावरचा अभ्यासक्रम शिकवायचा ते ठरवतात. 
मराठी शाळांचा प्रसार..
आज अमेरिकेच्या जवळजवळ 30 शहरातील 38 वेगवेगळ्या ठिकाणी मराठी शाळा चालवल्या जातात. 2013-2014 या वर्षात या शाळांमधून 900 मुलांनी मराठीचे धडे गिरवले. सुनंदा टुमणे या प्रकल्पाच्या समन्वयक आहेत. त्यांच्या अनुभवी मार्गदर्शनाखाली 120 हून अधिक स्थानिक शिक्षक वर्ग, सहाय्यक व शाळा संचालक निस्पृहतेने विनाशुल्क काम करतात. आज मराठी शाळा प्रकल्पांतर्गत नुसत्या अभ्यासक्रम आणि परीक्षांबरोबर इतरही अनेक उपक्रम चालवले जातात. 
गेल्या वर्षी प्रथमच या विद्यार्थ्यांचा ‘दिवाळी ई-अंक‘ही प्रसिद्ध झाला. या दिवाळी अंकातील ‘लेख‘ उत्तर अमेरिकेतील शाळेमधील अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या सुरेख हस्ताक्षरात लिहिले आहेत. या दिवाळी अंकात विविध शाळांतील वर्गांचे फोटो, मुलांनी काढलेली चित्रे आहेत. हा अंक शाळेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मुलांना इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर वाचता येतील, अशी ‘ई-बुक्स‘ही आता बनविण्यात आली आहेत. 
बृहन्महाराष्ट्र मंडळ आणि मराठी शाळा
बृहन्महाराष्ट्र मंडळ या प्रकल्पाला किती महत्त्व देते, ते मंडळाच्या पुढील अधिवेशनात असलेल्या शाळाविषयक कार्यक्रमांवरून आपल्या लक्षात येईल. पुढील वर्षी लॉस एंजलिसमध्ये होणाऱ्या या अधिवेशनात उत्तर अमेरिकेतील काही हजार मंडळी एकत्र जमणार आहेत. दर दोन वर्षांनी उत्तर अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरांत होणाऱ्या या अधिवेशनात भारतातूनही अनेक मान्यवर हजेरी लावतात. भारतातील आणि उत्तर अमेरिकेतील कलाकारांबरोबर यावेळी मराठी विद्यार्थ्यांचेही खास कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. अधिवेशन समितीतर्फे शाळांच्या विद्यार्थ्यांषाठी ‘गोष्ट सांगणे‘ आणि ‘स्टॅंड-अप कॉमेडी‘ या दोन खास स्पर्धांचे आयोजन केले गेले आहे. स्थानिक शाळांमधून जिंकलेल्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा घेतली जाईल. यातून जिंकलेल्या विद्यार्थ्यांना बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनामध्ये मराठीतून गोष्ट किंवा विनोद सांगण्याची संधी मिळेल. तसेच, या विजेत्यांना पारितोषिकेही देण्यात येतील. याशिवाय, मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांचे मराठी नाटक बसविण्याचा विचारही उत्तर अमेरिकेतील काही शाळा करत आहेत. मराठी भाषेसह मुलांमधील इतर कलागुणांनाही वाव मिळावा, असा विचार या आयोजनामागे आहे. 
एव्हाना अमेरिकेत मराठी पाचवी शिकलेली मुलंही दिसायला लागली आहेत. ही मुलं नुसतंच छान मराठी बोलत नाहीत, तर त्यांना मराठी लिहिता आणि वाचतादेखील येत आहे. वॉशिंग्टन डीसीच्या ऋचा पंडितने तर आपल्या मराठी शिक्षणाचा वापर अभिनव पद्धतीने केला. ऋचा मराठी शाळेची पाचवी इयत्ता उत्तीर्ण झाली आहे. मराठी पाचवीमध्ये तिला वृत्तपत्र लेखन आणि वाचन, समाजस्थितीवर लिहिणे, मराठीतून स्वत:ची मते व्यक्त करणे शिकता आले. 17 वर्षांच्या ऋचाने या शिक्षणामुळे महाराष्ट्रातील समवयस्क मुला-मुलींशी संवाद साधला. तिच्या भारतभेटीमध्ये तिने मुंबई, पुणे, मिरजमधील मराठी माध्यमाच्या सात शाळांमध्ये जाऊन विद्यार्थी आणि पालकांशी मराठीत चर्चा केली. पुण्यातील ‘डोअरस्टेप्स‘ या संस्थेच्या कामाठी लोकांसाठी बांधकामाच्या ठिकाणी चालविल्या जाणाऱ्या शाळेतही ऋचा जाऊन आली आहे. या सर्व चर्चा तिने रेकॉर्डही केल्या आहेत आणि याचा व्हिडिओ ती आपल्या अमेरिकेतील शाळेत दाखवणार आहेत. मराठी शाळेमुळे तिची नाळ पुन्हा एकदा तिच्या मुळांशी जोडली गेली आहे.
अमेरिकेमध्ये चालवल्या जाणाऱ्या मराठी शाळेच्या यशाची यापेक्षा मोठी पावती ती काय असणार...?

 

एम.के.एम. - ग्रेटर वॉशिंग्टन डी.सी -मराठी शाळा

एम.के.एम. - मराठी शाळा

संचालिका - दीप्ति पंडित


ग्रेटर वॉशिंग्टन डी.सी. च्या मेरीलँड व व्हर्जिनिया या भागात सहा ठिकाणी मराठी शाळा चालते. शाळेचे पहिली ते पाचवी असे वर्ग आहेत. भारती विद्यापीठ बृहनमहाराष्ट्र मंडळ यांचा अभ्यासक्रम या शाळेत राबवला जातो. वर्षा अखेर मराठी भाषा प्रमाणपत्र परीक्षा घेतल्या जातात.
 
खळाळत्या पोटोमॅकच्या दऱ्या वाढलेल्या मुलांना गोदावरीच्या पाण्याची गोडीही कळावी… 
आपल्या मुलांना मराठी भाषा यावी, नुसती बोलायलाच नव्हे तर वाचायला आणि लिहायलासुद्धा, अशी आपली मनीषा आहे का?
महाराष्ट्राचा अभिमान, मातृभाषेचे प्रेम, सह्याद्रीच्या कुशीत निपजलेल्या थोर रत्नांची ओळख, मराठी संस्कृती, कला, वाङ्मय, इतिहास व भूगोल यांचा परिचय आपल्या मुलांना व्हावा असे वाटते का?

ग्रेटर वॉशिंग्टन डी.सी. च्या मेरीलँड व व्हर्जिनिया या भागात सहा ठिकाणी आमची मराठी शाळा चालते.
  • बृहन महाराष्ट्र मंडळ व भारती विद्यापीठ पुणे महाराष्ट्र यांचा अभ्यासक्रम व प्रमाणपत्र परीक्षा.
  • इयत्ता पहिली ते पाचवी असे वर्ग.
  • आठवड्यातून एक दिवस, दीड तासांची शाळा.
  • सप्टेम्बर ते जून, तीन सत्रे. प्रत्येक सत्रात दहा वर्ग आणि त्यानंतर चाचणी परीक्षा.
  • काव्य, गोष्टी, नाट्यछटा, हस्तकला व खेळाच्या माध्यमातून भाषा कौशल्य विकसन.
  • भाषेचा वापर करण्याची विपुल संधी - वाचन गट, वस्तू किंवा विषयावर गट चर्चा, म्हणजेच शो & टेल, लेखन व संभाषण सराव.
  • बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे मुलांचा दिवाळी अंक, स्पर्धा, व नवीन उपक्रमात सहभाग.
  • मराठी शाळा वार्षिक दिन सोहळा.

अधिक माहितीकरता येथे संपर्क साधा: mkmmarathishala@gmail.com
 

अमेरिकेत असणारी मराठी मंडळे

अमेरिकेत असणारी मराठी मंडळे -

अमेरिका / North America (U. S. and Canada)

अमेरिकन राज्य      मंडळ नाव        संकेतस्थळ     अध्यक्ष




Ann Arbor
Ann Arbor Marathi Mandal http://www.A2MM.org Mandar Kulkarni




Atlanta
Maharashtra Mandal of Atlanta http://www.mmatlanta.org Vaibhav & Pallavi Sathe




Austin
Austin Marathi Mandal http://www.austinmarathi mandal.org Sandeep Kulkarni




BMM
बृहन्महाराष्ट्र मंडळ of North America http://bmmonline.org/  Madhuri Joshi




Boston
New England Marathi Mandal http://www.nemm.org/ Shripad Godbole








                                                                                                                                                                         आणखी माहितीसाठी येथे क्लिक करा ………….































                                                                                                      

Friday, 14 November 2014

" एकता " त्रैमासिक : गेली ३३ वर्षें भारताबाहेर जपलेला मायमराठीचा दीपस्तंभ

" एकता " त्रैमासिक : गेली ३३ वर्षें भारताबाहेर जपलेला मायमराठीचा दीपस्तंभ

 एकता हे त्रैमासिक म्हणजे अखिल मराठी भाषकांसाठी गेली ३३वर्षें कॅनडामधील टोरांटो येथून मायमराठीच्या अतूट धाग्याने गुंफलेली एक कलाकृती. टोरांटो, कॅनडा येथील अशोक पांगारकर, प्रकाश अडावदकर, डॉ. जोशी (पिट्‌स्बर्ग, अमेरिका) आणि काही ध्येयवेड्या मराठीप्रेमी मंडळींनी विना नफा तत्त्वावर १९७९ साली ’ एकता ’ ह्या त्रैमासिकाचा श्रीगणेशा केला. आपापले व्यवसाय आणि व्यस्त वेळापत्रक सांभाळून सेवाभावनेने ह्या लष्करच्या भाकर्‍या भाजतांना भाकरीची चव टिकवणे सोपे नाही. ह्या त्रैमासिकातील दर्जेदार मजकूर, संपादन, छपाई आणि वितरणामधे कित्येक स्वयंसेवक, लेखक, वर्गणीदार वाचक आणि काही प्रमाणात आर्थिक पाठिंबा देणारे व्यावसायिक जाहिरातदार असे अनेक मराठी भाषक  गेली ३३ वषें एकत्वाचे सूत्र जपत आहेत. ’ एकता ’ च्या आतापर्यंतच्या तीन दशकोत्तर यशस्वी वाटचालीमागे अनेकांचे परिश्रम आहेत. ह्या प्रदीर्घ कालावधीत ज्या काही व्यक्तींच्या/कुटुंबीयांच्या पावलांचा खोल ठसा उमटलेला आहे. त्यातले एक ठळक नांव आहे - टोरांटोवासी विनायक गोखले आणि प्रतिभा गोखले.

                                                                                        आणखी माहितीसाठी  येथे क्लिक करा ……………… 


जगात मराठी भाषा कोठे कोठे बोलली जाते ????


जगात मराठी भाषा कोठे कोठे बोलली जाते ????

हा नकाशा पहा लाल रंगत दाखवलेले देशात मराठीचा वापर आणि मराठी लोक आढळतील …


अमेरिकेची संयुक्त संस्थाने, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंड