एम.के.एम. - मराठी शाळा
संचालिका - दीप्ति पंडित
ग्रेटर वॉशिंग्टन डी.सी. च्या मेरीलँड व व्हर्जिनिया या भागात सहा ठिकाणी मराठी शाळा चालते. शाळेचे पहिली ते पाचवी असे वर्ग आहेत. भारती विद्यापीठ बृहनमहाराष्ट्र मंडळ यांचा अभ्यासक्रम या शाळेत राबवला जातो. वर्षा अखेर मराठी भाषा प्रमाणपत्र परीक्षा घेतल्या जातात.
खळाळत्या पोटोमॅकच्या दऱ्यात वाढलेल्या मुलांना गोदावरीच्या पाण्याची गोडीही कळावी…
आपल्या मुलांना मराठी भाषा यावी, नुसती बोलायलाच नव्हे तर वाचायला आणि लिहायलासुद्धा, अशी आपली मनीषा आहे का?
महाराष्ट्राचा अभिमान, मातृभाषेचे प्रेम, सह्याद्रीच्या कुशीत निपजलेल्या थोर रत्नांची ओळख, मराठी संस्कृती, कला, वाङ्मय, इतिहास व भूगोल यांचा परिचय आपल्या मुलांना व्हावा असे वाटते का?
ग्रेटर वॉशिंग्टन डी.सी. च्या मेरीलँड व व्हर्जिनिया या भागात सहा ठिकाणी आमची मराठी शाळा चालते.
- बृहन महाराष्ट्र मंडळ व भारती विद्यापीठ पुणे महाराष्ट्र यांचा अभ्यासक्रम व प्रमाणपत्र परीक्षा.
- इयत्ता पहिली ते पाचवी असे वर्ग.
- आठवड्यातून एक दिवस, दीड तासांची शाळा.
- सप्टेम्बर ते जून, तीन सत्रे. प्रत्येक सत्रात दहा वर्ग आणि त्यानंतर चाचणी परीक्षा.
- काव्य, गोष्टी, नाट्यछटा, हस्तकला व खेळाच्या माध्यमातून भाषा कौशल्य विकसन.
- भाषेचा वापर करण्याची विपुल संधी - वाचन गट, वस्तू किंवा विषयावर गट चर्चा, म्हणजेच शो & टेल, लेखन व संभाषण सराव.
- बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे मुलांचा दिवाळी अंक, स्पर्धा, व नवीन उपक्रमात सहभाग.
- मराठी शाळा वार्षिक दिन सोहळा.
अधिक माहितीकरता येथे संपर्क साधा: mkmmarathishala@gmail.com
No comments:
Post a Comment